जास्त व्यायाम करायची वेळच येणार नाही. रोज करा हा एक व्यायाम.
धावपळीच्या आयुष्यात स्वत:ला द्यायला वेळच कोणाकडे उरलेला नाही. तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.
काही सोप्या व्यायाम प्रकारांमुळे शरीर मजबूत राहते. रोज मोजून दहा मिनिटे काही व्यायाम करायचे. रोज उठल्यावर प्लँक केल्याने अनेक फायदे मिळतात.
प्लँक करायला एकदम सोपा प्रकार आहे. हातावर आणि पायावर जोर देऊन आडव्या स्थितीत शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
पाठीचे आणि कमरेचे स्नायू मोकळे होण्यासाठी हा व्यायाम प्रकार फार उपयुक्त ठरतो. लवचिकता वाढते.
चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार एकदम उपयुक्त आहे. रोज फक्त पाच ते दहा मिनिटे हा व्यायाम प्रकार करा.
पायातील ताकद वाढण्यासाठी प्लँक फायद्याचे असते. तसेच हातातील शक्ती वाढवण्यासाठीही हा व्यायाम प्रकार फायद्याचा आहे.
सांधेदुखी, सांधे आखडणे असे काही त्रास होत असतील तर ते पूर्ण बंद होतील. फक्त रोज थोडावेळ हा व्यायाम प्रकार करायचा.
शरीराचे संतुलन वाढते आणि त्यामुळे शरीराचे अनेक त्रास कमी होतात. सुरवातीला काही सेकंद मग हळूहळू प्लँक करायची वेळ वाढवायची.