सुकलेले लिंबू आणि लिंबाची साले फेकू नका, पाहा काय करायचे
सुकलेले लिंबू तसेच लिंबाची सालं विविध प्रकारे वापरता येतात. पाहा कसे.
लिंबाचा वापर आपण जवळपास रोजच करतो. पदार्थात लिंबाचा रस पिळल्यावर चव मस्त लागते शिवाय लिंबाचा रस आरोग्यासाठी चांगला.
लिंबाचा रस फक्त अन्नात वापरला जात नाही. तो इतरही अनेक गोष्टींसाठी वापरतात. ब्यूटी प्रॉडक्ट तसेच घरगुती विविध उपायांसाठी लिंबू वापरला जातो.
लिंबाचा रस पिळून घेतल्यावर लिंबाची साले आपण फेकून देतो. मात्र लिंबाची साले सुकवून वापरल्याचे काही फायदे आहेत. उन्हाळ्यात लिंबू पटकन सुकून जाते. ते फेकू नका त्याचा वापर करता येतो.
सुकलेले लिंबू पाण्यात मिसळून काचा फरशी पुसण्यासाठी घरातच लिक्विड करता येते. बेकींग सोडा आणि लिंबाचा वापर करुन ओटा, लादी साफ करु शकता.
जर लिंबू सुकले आहे तर ते गरम पाण्यात घालून उकळवून घ्या. त्याचा रस काढून ठेवा. भांडी घासताना वापरा. भांड्यांवरचे तेलकट डाग जातात.
कपड्यांना लागलेले तेलाचे तिखटाचे डाग काढण्यासाठीही लिंबाचा वापर करता येतो. पाण्यात लिंबू आणि कपडे भिजत ठेवा नंतर डागावर लिंबाने रगडून चोळा. डाग नाहीसे होतात.
सुकलेल्या लिंबाचा स्क्रब म्हणून वापर करु शकता. अंघोळ करताना किंवा फ्रेश होताना सुकलेली फोड वापरायची.
लिंबाची साले वाळवून घ्यायची. त्याची पूड करुन घ्यायची. त्याचा वापर ब्यूटी प्रॉडक्ट तसेच अंग साफ करण्यासाठी तयार केलेल्या घरगुती पर्यायांमध्ये करता येतो.