हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळस ही लक्ष्मी मातेचं प्रतीक मानले जाते
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळस ही लक्ष्मी मातेचं प्रतीक मानले जाते. तुम्हाला अनेक घरांमध्ये तुळशीचं रोप पाहायला मिळतं.
तुळशीचं रोप सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तुळशीचं रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासोबतच धन प्राप्तीचा संकेत देते.
तुळस भगवान विष्णू यांच्यासोबत सर्व देवतांचे आवडीचं रोप आहे. तुम्ही दररोज या रोपाची पूजा केली पाहिजे.
आज आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणत्या ठिकाणी चुकूनही तुळशीचं रोप ठेवलं नाही पाहिजे. जेणेकरुन तुमच्यावर लक्ष्मी देवी नाराज होऊ नये.
तुळशीचं रोप कधीच छतावर किंवा गच्चीवर ठेवलं नाही पाहिजे. असं करणं अशुभ मानले जाते. तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून जाते.
जर तुम्हाला तुळशीचं रोप ठेवायचं आहे तर त्यासाठी अंगण किंवा बाल्कनी सर्वोत्तम जागा मानली जाते. या ठिकाणी रोप ठेवल्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते.
तुळशीचं रोप कधीच अंधार असेल अशा ठिकाणी ठेवू नये. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते.
तुळशीचं रोप सूर्य प्रकाशाच्या ठिकाणी ठेवले पाहिजे. ज्यामुळे आपल्या जीवनातील अंधःकार दूर होऊन प्रकाशमय होईल. आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद येईल.
तुळस अस्वच्छ ठिकाणी ठेवली नाही पाहिजे. ज्यामुळे देवी-देवता नाराज होऊ शकतात. तुळशीचं रोप नेहमीच स्वच्छ ठिकाणी ठेवावे.