रातोरात सिनेमातून हकालपट्टी  झालेल्या अभिनेत्री, पाहा बिनसले काय..

बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना अनेक कारणांमुळे चित्रपटांमधून बाहेर काढले गेले. 

नुकतेच बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला 'स्पिरीट' सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

दीपिका लेकीच्या संगोपनात व्यस्त असल्याने, तिने दिवसातले आठ तासच शूटिंग करणार असल्याचं दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना सांगितलं होतं. 

पण, तिचा हाच निर्णय संदीप रेड्डी वांगा यांना पटला नाही आणि तिला सिनेमातून काढण्यात आलं. 

बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना वैयक्तिक किंवा इतर कारणांमुळे चित्रपटांमधून अचानक बाहेर काढले गेले आहे. 

वैवाहिक जीवनातील समस्या आणि शाहरुख खानसोबतच्या नातेसंबंधांमुळे ऐश्वर्याला 'चलते चलते' चित्रपटातून बाहेर पडावे लागले. तिच्या जागी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली. 


'पती पत्नी और वो' या चित्रपटांतून तापसी पन्नूला वगळून तिच्या जागी भूमी पेडणेकरला ही भूमिका दिली गेली. तापसीने याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 

कतरिना कैफला 'साया' चित्रपटांतून बाहेर काढून ती भूमिका तारा शर्माला देण्यात आली होती. 

'सायना' या बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने शूटिंग सुरू केली होती, पण नंतर तिच्या जागी परिणीती चोप्राची निवड झाली. 

'देवदास' फिल्ममध्ये 'पारो' च्या रोलसाठी करीनाची निवड केली होती, पण त्यानंतर ऐश्वर्या राय हिला तो रोल देण्यात आला.

Click Here