दारू न पिताही खराब होऊ शकतं लिव्हर?

फॅटी लिव्हरची समस्या आज भरपूर लोकांना होत आहे. याचं कारण केवळ दारू नाही.

इन्सुलिन रेजिस्टेंसमुळे हाय झालेली ब्लड शुगर लिव्हरला खराब करते. यामुळे कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन पचन थांबतं. हे तत्व लिव्हरच्या सेल्समध्ये जमा होऊ लागतात.

हायपरटेंशनमुळे किडनी आणि लिव्हरला नुकसान पोहोचतं. ब्लड प्रेशर वाढल्याने लिव्हरला रक्त पुरवणाऱ्या नसा आकुंचन पावतात आणि त्याला रक्त मिळू शकत नाही. 

जर कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर फॅटी लिव्हर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. बॅड कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये जाऊन जमा होतं आणि त्याला फॅटी बनवतं. हळूहळू लिव्हर कमजोर होतं.

डाएटमध्ये व्हिटामिन ई आणि फायबर नसेल, दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी पित नसाल आणि रोज 30 ते 40 मिनिटं चालत नसाल तर लिव्हरवर फॅट जमा होतं.

बरेच लोक घरच्या जेवणाऐवजी बाहेरच्या फास्ट फूडला प्राधान्य देतात. पौष्टिक आहाराऐवजी बर्गर, फ्रेंच फ्राइज, नूडल्स खातात. मात्र, हे पदार्थ तुमचं लिव्हर डॅमेज करू शकतात.

नेहमीच सोडा किंवा कोल्ड ड्रिंक पिणंही तुम्हाला महागात पडू शकतं. या गोष्टींनी सुद्धा लिव्हर डॅमेजचा धोका असतो. तुम्हाला सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असेल तर लगेच बंद करा.

Click Here