उन्हाळ्यात प्या' हे' नारळ पाण्याचे मॉकटेल

फक्त नारळ पाणी पिण्यापेक्षा त्याचे असे सरबत करुन प्या. नक्कीच आवडेल. 

उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी प्यायलाच हवे. आरोग्यासाठी ते फार पौष्टिक आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाण्याचा उपयोग होतो. 

उन्हाळ्यामध्ये नारळ पाणीही चांगले व पुदिनाही चांगला. तसेच इतरही काही पदार्थ उपयुक्त असतात. त्या पदार्थांचे मिश्रण करुन असे मॉकटेल करा.

एका ग्लासमध्ये नारळ पाणी घ्या. नारळ पाणी गोड असते त्यामुळे साखर घालायची गरज नाही. 

नारळ पाण्यामध्ये एक लिंबू पिळा. त्वचेसाठी लिंबू फार चांगला असतो. तसेच त्यामध्ये जीवनसत्त्व 'सी' असते.

त्यामध्ये भिजवलेला सब्जा टाका. सब्जा हा पदार्थ सरबतांमध्ये फार छान लागतो. 

त्यामध्ये पुदिन्याची काही पाने टाका. मॉकटेल छान ढवळून घ्या.

त्यामध्ये सैंधव मीठ टाका. अगदी चिमूटभर मीठ टाकायचे.

 मस्त गारेगार मॉकटेल प्या.  करायला सोपे आहे आणि आरोग्यासाठी फायद्याचे.

Click Here