चनाचूर गरम कधी खाल्ले का ? चवीला एकदम मस्त असणारा हा चाटचा प्रकार करा घरीच.
चनाचूर गरम हा लोकप्रिय असा खाऊ आहे. रेल्वे स्टेशनला मिळणारे चनाचूर चाट नक्कीच खाल्ले असेल.
चवीला फार मस्त असते. तसेच घरी करायलाही अगदी सोपे आहे. पाहा कसे करायचे.
साहित्य - चनाचूर, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, चाट मसाला, लाल तिखट, लिंबू, बटाटा
बटाटा उकडून घ्यायचा. सालं काढायची आणि त्याचे तुकडे करायचे. कांदा बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा.
हिरव्या मिरचीची आणि कोथिंबीरीची पेस्ट करायची. घट्ट करा. पाणी घालायचे नाही.
एका खोलगट पातेल्यात चनाचूर गरम घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. चिरलेला टोमॅटो घालायचा.
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मिरचीची पेस्ट घालायची. चाट मसाला घालायचा. लाल तिखट घालायचे. मीठ घालायचे. बटाट्याचे तुकडे घालायचे.
व्यवस्थित मिक्स करायचे. लिंबाचा रस घालायचा आणि खायचे. चवीला फार मस्त लागते.