त्वचा छान चमकावी असे वाटत असेल तर त्यासाठी काही पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे. पाहा कोणते पदार्थ आहेत.
केसर खाल्याने तसेच केसरयुक्त प्रॉडक्ट्स वापरल्याने त्वचेचा रंग उजळतो. त्वचा छान दिसायला लागते.
आवळा खाणे त्वचेसाठी फार चांगले ठरते. आवळ्यात विविध गुणधर्म असतात.
हळद अँण्टी इंमफ्लामेंटरी असते त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. त्वचा उजळते.
त्वचा मऊ व्हावी असे वाटत असेल तर चेहऱ्याला तूप लावा. तसेच आहारात तुपाचा समावेश करुन घ्या.
नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी जसे उपयुक्त असते तसेच त्वचेसाठीही असते.
बीटामुळे ओठ, चेहरा , त्वचा सारेच छान होते. बीटाचा रस लावायचा तसेच बीट खायचे.