अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
गेल्या काही वर्षांमध्ये सोनालीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने हटके अंदाजात पोझ देत खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सोनाली बेंद्रेचं हे सुंदर फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.