भूमी पेडणेकर सध्या चर्चेत, वजनही केलं कमी

सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असलेली भूमी २०१५ ते २०२५ या काळातील एक गाजलेली अभिनेत्री आहे.

सध्या गाजलेल्या अभिनेत्रींच्या यादीत भूमी पेंडणेकरचे नाव वरती आहे. सध्या तिच्या नव्या सिरीजसाठी ती फार चर्चेत आहे. 

भूमी पेडणेकर सध्या 'द रॉयल्स' या सिरीजमधील तिच्या हॉट लूकसाठी फार नावाजली. अनेकांनी तिला ट्रोलही केले. २०१५ ते २०२५ या दहा वर्षात भूमीने कमालीचे बॉडी ट्रान्सपरेशन केले आहे. 

भूमीने तिचा पहिला चित्रपट 'दम लगा के हईशा'साठी ३० किलो वजन वाढवले होते. मात्र चित्रपटानंतर तिने केलेले वेटलॉस पाहून लोक अवाक झाले.

२०१५ ते २०१७ या दोन वर्षाच्या काळात तिने व्यायाम, डाएट सगळ्या नैसर्गिक पर्यायांचा अवलंब करत जवळपास ३५ किलो वजन कमी केले. 

भूमी तिच्या मुलाखतीत कायम सांगते मानसिक आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. तिने कायम मानसिक आरोग्याला महत्व दिलं त्याचा तिला फायदा झाला. 

भूमीच्या ओठांवरुन सोशल मिडियावर भरपूर ट्रोलिंग होते. तिने लिप ट्रिटमेंट केली आहे असे म्हणत तिला फेक म्हटले जात आहे. 

दुसरीकडे तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने नैसर्गिक राहायला आवडते असे सांगितले. सध्या भूमी अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. 

Click Here