अभिनयामुळे चर्चेत राहणारी भाग्या सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
भाग्या नायर मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतून अभिनेत्री भाग्या नायर घराघरात पोहचली. मालिकेत तिने अभिरामची पत्नी कावेरीची भूमिका साकारली होती.
भाग्याने नुकतेच हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये भाग्याने व्हाइट रंगाचा वनपीस परिधान केलाय. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये नेचर थेरपी असं लिहिलं आहे.
यात भाग्याने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
या फोटोशूटमध्ये भाग्या खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.