गुलाबाच्या पाकळ्या फेकू नका. त्याचा विविध प्रकारे वापर करता येतो. पाहा कसा करायचा.
गुलाबाचं फुल फार सुंदर असतं. त्याच्या पाकळ्या जेवढ्या सुंदर तेवढ्याच उपयुक्तही असतात.
गुलाबाच्या पाकळ्यांचा विविध प्रकारे वापर करता येतो. गुलाब फेकून देऊ नका. त्याचा असा वापर करा.
गुलाबाच्या पाकळ्या चहात घालता येतात. चहाला सुगंध येतो. तसेच चवही छान लागते. फक्त पाकळ्या फार उकळायच्या नाहीत.
गुलाबपाणी त्वचेसाठी फार चांगले असते. गुलाबाच्या पाकळ्या उकळून त्याचे पाणी साठवा आणि वापरा.
घरी गुलकंद तयार करणे फार सोपे असते. साखर, गुलाब पाकळ्या एकत्र करुन त्याचा गुलकंद करणे फार सोपे आहे.
स्किनकेअरसाठी या पाकळ्या वापरता येतात. त्वचेसाठी त्या फार फायद्याच्या असतात.
गुलाबाच्या पाकळ्या वाळवून त्यात इतर काही गोष्टी घालून, त्याचा वापर सुगंधी धुप म्हणून करता येतो.
केक, कुकीज, आदी पदार्थांवर सुक्या गुलाब पाकळ्या घालता येतात. पदार्थ मस्त दिसतात.