सध्या परीक्षेचे दिवस आहेत. म्हणूनच मुलांचा अभ्यास चांगला होणं गरजेचं आहे. त्यासाठीच पुढे काही खास टिप्स सांगितल्या आहेत.
मुलांनी योग्य वेळी योग्य पद्धतीने अभ्यास केला तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम त्यांच्या परीक्षेतल्या गुणांवर दिसून येतो.
तज्ज्ञ असं सांगतात की सकाळी ६ ते १० यावेळी मन शांत असतं. त्यामुळे या वेळी मुलांना नक्कीच अभ्यासाला बसवा.
मुलं जर सकाळच्या वेळी १० ते १५ मिनिटे स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करून अभ्यासाला बसली तर एकाग्रता आणखी वाढते.
तसेच मुलांना कधीही रिकाम्यापोटी अभ्यासाला बसवू नका. जेव्हा पोट भरलेलं असेल तेव्हाच त्यांचा चांगला अभ्यास होईल.
१० ते २ या वेळेत आपला मेंदू जास्त ॲक्टीव्ह असतो. अशावेळी गणित, विज्ञान किंवा मुलांना जे विषय अवघड वाटतात त्याचा अभ्यास करायला सांगा.
साधारण एखादा तास अभ्यास झाल्यानंतर मुलांना ४ ते ५ मिनिटांचा छोटा ब्रेक द्या. यामुळे पुन्हा ते तेवढ्याच जोमाने अभ्यासाला बसतात.