पावसाळा, थंडी अशा दिवसात गरमगरम तळलेले पदार्थ खाण्याचा मोह होतोच.. पण त्याचवेळी आरोग्याची काळजीही असतेच.
अतितेलकट खाण्यामुळे वजन तर वाढतंच पण हृदय आणि लिव्हरचं आरोग्यही धोक्यात येतं.
म्हणूनच डिप फ्राय करण्यासाठी तेलाची निवड योग्य पद्धतीने करायला हवी असं तज्ज्ञ सांगतात..
रिफाईंड कोकोनट ऑईल तळणासाठी चांगले आहे. त्याचा स्मोक पॉईंट जास्त असून सॅच्युरेटेड फॅट्सही त्यात जास्त असतात.
ऑलिव्ह ऑईलदेखील वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी चांगलं मानलं जातं.
परदेशात ॲव्हाकॅडो ऑईल वापरून पदार्थ तळले जातात.
जर एखादा पदार्थ नुसताच शॅलोफ्राय करायचा असेल तर अशावेळी तूप चांगले आहे.