थंडीच हातपाय आखडू नयेत यासाठी खास उपाय. पाहा काय करायचे.
थंडीने शरीर आखडते. त्यामुळे आळस येतो आणि सारखी झोप येते. स्नायू आणि हाडेही कुरकुरतात. अशावेळी तिळाच्या तेलाने मालिश करणे फायद्याचे ठरते.
तिळाचे तेल शरीरात उष्णता निर्माण करते. वातदोष कमी करते. त्वचा मऊ आणि लवचिक ठवते.
हे तेल वातनाशक मानले जाते. सांधेदुखी तसेच मज्जासंस्थेचे त्रास या तेलाच्या मालिशमुळे कमी होते.
तिळाच्या तेलात अँटी ऑक्सिडंट्स असतात. जीवनसत्व सी असते त्यामुळे पेशी मोकळ्या होतात आणि तरतरी येते.
या तेलात सूज कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे कोणत्याही कारणामुळे जर शरीराला सूज आली आसेल तर ती कमी होते.
तिळाचे तेल त्वचेचा कोरडेपणा कमी करते. तसेच त्वचा उजळवते आणि त्वचा छान ठेवते.
थंड वातावरणात या तेलाचा वापर करणे नक्कीच आरोग्यासाठी फायद्याचे आहे. रात्री झोपताना तिळाच्या तेलाने मालिश करा म्हणजे झोपही छान लागते.