रोज प्या दालचिनीचा काढा, वेटलॉससह मिळतील ५ फायदे

दिवसाची सुरुवात जर तुम्ही दालचिनीचा काढा घेऊन केली तर त्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील.

काही जण तर दालचिनीच्या काढ्याला मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणतं. कारण त्याच्यामुळे शरीर आतून शुद्ध होण्यास मदत होते.

दालचिनी मेटाबॉलिझम अधिक चांगलं करते. त्यामुळे कॅलरी वेगात बर्न होतात आणि वेटलॉस होण्यास मदत होते.

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठीही दालचिनीचा काढा पिणे फायदेशीर ठरते.

दालचिनीमध्ये ॲण्टीइन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरावरची सूज कमी होते.

सकाळी उपाशीपोटी दालचिनीचा काढा प्यायल्यास पचनक्रियाही अधिक चांगली होते. अपचन, ॲसिडीटी, ब्लोटिंग असे त्रास कमी होतात. 

ज्यांच्या तोंडाला कायम दुर्गंधी येते, त्यांच्यासाठीही दालचिनीचा काढा पिणे फायदेशीर ठरते. 

Click Here