रोज दही खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' परिणाम

तुम्हीही जर नेहमीच वाटीभर दही खात असाल तर हे वाचायलाच हवे...

नियमितपणे दही खाल्ल्यास आरोग्याला भरपूर फायदे होतात. त्यातून प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात मिळतं.

दही हे प्रोबायोटीक असल्याने पचनक्रिया अधिक चांगली होेण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.

त्वचेचं आरोग्य अधिक चांगलं होण्यासाठीही दह्याची मदत होते. दही चेहऱ्याला लावल्याने त्वचा मऊ, चमकदार होते.

दही थंड असतं असं समजून ते खात असाल तर ते मात्र चुकीचं आहे. दही हे उष्ण असतं, असं कित्येक आयुर्वेदिक एक्सपर्ट सांगतात.

नुसतं दही खाण्यापेक्षा साखर किंवा मीठ घालून खाणं आरोग्यासाठी अधिक चांगलं मानलं जातं. 

Click Here