लसणाचा चहा आरोग्यासाठी वरदान, कसा कराल?

लसणाचा चहा एक पावरफुल टॉनिक मानला जातो. ज्याने कफ आणि सर्दी-पळसा दूर होतो.

लसणाच्या चहात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-वायरल गुण असतात. ज्यानं इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.

लसणामध्ये असे तत्व असतात जे कोलेस्टेरॉल लेव्हल आणि ब्लड प्रेशर कमी करतात. लसणाच्या चहामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

लसणाच्या चहामध्ये डिटॉक्सिफिकेशन गुण असतात जे लिव्हर, किडनी आणि इतर अवयवांना साफ करण्यास मदत करतात. 

लसणाच्या चहामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. 

लसणाच्या चहामध्ये असे काही तत्व असतात जे पचनासंबंधी एंझाइम्स तयार करतात आणि पचनक्रिया चांगली करतात. 

हा चहा वजन कमी करण्यास मदत करतो. कारण या चहामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होतं आणि चरबी लवकर बर्न होते. 

लसणाच्या चहानं ब्लोटिंग, गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या दूर होऊन पोटाला आराम मिळतो.

३ ते ४ लसणाच्या कळ्या दोन कप उकडत्या पाण्यात टाका. चहा कपात टाकल्यावर वरून लिंबू आणि मध टाका. तुमचा चहा तयार आहे. 

Click Here