नैसर्गिक सौंदर्य जपणाऱ्या आणि कोणत्याही ट्रिटमेंट न घेतलेल्या अभिनेत्री.
सध्या नैसर्गिक सौंदर्याला फार महत्व उरलेलं नाही. कटू आहे मात्र हेच सत्य आहे. परफेक्ट दिसण्याच्या नादात स्वतःचे नाविन्य बाजूला सारुन सगळ्यांप्रमाणे दिसण्यात रस जास्त आहे.
आजकाल अशा मोजक्या अभिनेत्री असतील ज्यांनी कोणतीही सर्जरी केलेली नाही. नाक, कान, ओठ, छाती ते इतर सगळ्या अवयवांवर ट्रिटमेंट केल्या जातात.
मात्र एक काळ होता जेव्हा नैसर्गिक सौंदर्याला जास्त महत्व दिले जायचे. ना जास्त दिखावे ना खोटेपणा. बॉलिवूडचा तो सॉफ्ट एरा आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे.
सोनाली बेंद्रे अत्यंत सुंदर अशी अभिनेत्री आहे. तिच्या रुपातील साधेपणा कायम छानच वाटायचा. तिच्या साऱ्या भूमिकांमध्ये ती सुंदर दिसली आहे.
प्रिती झिंटाच्या एका खळीवर लोक फिदा होते. लहान केस, कमी मेकअप तरीही दिसायला अत्यंत सुंदर. आजही ती तेवढीच सुंदर आहे.
राणी मुखर्जी नवीन आली तेव्हा तिचे सावळे आणि नाजूक रुप अगदी सुंदर दिसायचे. सिनेमा क्षेत्रात रंगाला महत्व जास्त दिले जाते. मात्र राणीने त्या काळातही स्वत:चे नाव मोठे केले.
ऐश्वर्या राय जगातल्या सुंदर महिलांपैकी एक मानली जाते. तिचे डोळे आणि त्वचा कायमच सगळ्यांना अवाक करते. ९०s मध्ये ऐश्वर्या साधे कपडे आणि कमी मेकअप अशीच दिसायची.
करिना कपूरही फार सुंदर अभिनेत्री आहे. बेबो हॉट पेहरावात मस्त दिसतेच. मात्र तिच्या जुन्या चित्रपटांमधील व्यक्तिमत्व तिला सुट करायचे.
धकधक क्विन माधुरी फक्त एका स्माईलने लोकांना वेड लावत असे. माधुरी अगदी नैसर्गिक सौंदर्याची खाण आहे. शरीराची सुबकता आणि साधे रुप म्हणजे माधुरी.
सौंदर्यवतींच्या यादीत जुही चावलाला विसरुन चालणार नाही. जुहीने भूमिका विविध केल्या मात्र तिचे रुप कायम साधे सुंदरच असायचे. अशा क्वचितच भूमिका असतील ज्यात तिचे फार भडक रुप दिसले.
अगदी काहीच चित्रपटांमध्ये दिसलेली भाग्यश्री पटवर्धनही एक फार सुंदर अशी अभिनेत्री आहे. तिचे सिंपल रुप नक्कीच सगळ्यांच्या पसंतीस पडले होते.