पारंपरिक बटाट्याची कापं खा, कुरकुरीत चव अहाहा

बटाट्याचे काप या पद्धतीने करा. चवीला मस्त आणि करायला सोपे. 

बटाट्याची कापं हा पदार्थ महाराष्ट्रातील गावोगावी केला जातो. अगदी सोपा आणि फार चविष्ट पदार्थ आहे. 

साहित्य : बटाटा, हळद, लाल तिखट, मीठ, तेल, पाणी 

एका पसरट ताटलीत चमचाभर हळद, चमचाभर मीठ दोन ते तीन चमचे लाल तिखट घ्यायचे. मसाल्यांत थोडे पाणी घालायचे. 

बटाट्याचे गोलाकार काप करुन घ्यायचे. मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचे. मग पाणी काढून टाकायचे. 

तयार केलेल्या मसाल्यांच्या मिश्रणात काप बुडवायचे. कापाला सगळ्या बाजूंनी मसाला लावायचा. 

पॅनमध्ये तेल घ्यायचे. त्यावर तयार काप लावायचे आणि दोन्ही बाजूनी खमंग - कुरकुरीत परतून घ्यायचे.     

Click Here