सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर काही चुका रोज करत असाल तर त्यामुळे तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू लागता...
त्यापैकी पहिली चूक म्हणजे सकाळचा नाश्ता टाळणे. त्यामुळे कोर्टीसॉल हार्मोन वाढते, मेटाबॉलिझम आणि एनर्जी कमी होते. स्नायू थकतात.
सकाळी उठताच फोन पाहण्याच्या सवयीमुळे स्ट्रेस वाढत जातो. डोळ्यांवरही ताण येतो. एन्झायटी वाढते. त्यामुळे हार्मोन्सचे संतुलनही बिघडू शकते.
सकाळी उठताच पाणी न पिताच चहा- कॉफी घेत असाल तर शरीर वेगाने डिहायड्रेटेड व्हायला लागते. त्यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या वाढू लागतात.
उन्हात जाऊन व्यायाम करणे टाळत असाल तर हाडं कमकुवत होतात, शरीरातलं व्हिटॅमिन डी कमी होतं.
सकाळी उठून चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावा. नाहीतर शरीराप्रमाणेच त्वचाही डिहायड्रेटेड होण्यास सुरुवात होते.