पाणी पिताना 'या' चुका केल्या तर नक्कीच आजारी पडाल 

पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. नाहीतर आरोग्याच्या कित्येक तक्रारी डोकं वर काढू शकतात...

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेवणाच्या आधीच घटाघटा पाणी पिणे टाळा. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगल्यासारखे वाटते.

त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर लगेचच भरपूर पाणी पिणेही टाळायला हवे. यामुळेही पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हवे.

व्यायाम करतानाही भरपूर पाणी पिणं टाळायला हवं. त्याऐवजी थकल्यासारखं वाटल्यास घोट- घोट करत पाणी प्या.

सकाळी उठल्यानंतर लगेचच एखादा ग्लास पाणी पिणं ठिक आहे. जास्तीचं पाणी बळजबरीने प्याल तर किडनीवर ताण येऊ शकतो.

उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंडगार पाणी पिऊ नका. जरा वेळ शांत बसा आणि नंतर सावकाशपणे पाणी प्या.

तहान लागलेली नसताना उगाच प्यायचं म्हणून पाणी पिऊ नका. किडनीच्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही. 

Click Here