सकाळची कॉफी पिण्याआधी नक्की करा या गोष्टी. पाहा कोणत्या चुका टाळणे असते महत्वाचे.
सकाळी कॉफी प्यायची सवय असेल तर कॉफी पिताना या काही चुका टाळा. शरीरावर दुष्परिणाम होणार नाही.
कॉफी शरीरासाठी चांगली ही ठरु शकते, तसेच वाईटही. कॉफी कशी पिता याला महत्व असते. कोणती पिता यालाही महत्व असते.
सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच कॉफी पिऊ नये. तासभराने प्यावी. म्हणजे cortisol ची पातळी संतुलित राहते.
उपाशीपोटी कॉफी पिणे टाळायला हवे. कारण रिकाम्यापोटी चहा - कॉफी प्यायल्याने अपचन आणि गॅसेस होतात.
कॉफीमध्ये भरपूर साखर घातली की कॉफीचे पोषण संपते आणि त्याचे रुपांतर एका कॅलोरिजने भरलेल्या पेयात होते. त्यामुळे कॉफीत साखर नका वापरु.
कॉफी पिण्याआधी ग्लासभर पाणी प्या. त्यामुळे शरीराला गरजेचे तेवढे हायड्रेशन मिळते. पाणी प्यायल्यानंतर पाच मिनिटांनी कॉफी प्या.
कॉफीचा अतिरेक चांगला नाही. भरपूर कॉफी पिऊ नका. कपभर पुरे झाली. त्यापेक्षा पिणे झोपेवर आणि मानसिकतेवर परिणाम करते.