या ६ पदार्थांमुळे त्वचा होते खराब   

असे पदार्थ खाणे टाळा. पाहा कोणते पदार्थ आहेत जे त्वचेसाठी हानिकारक ठरतात. 

आपण काय पदार्थ खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. काही पदार्थ असतात जे आपण फार आवडीने खातो. मात्र त्वचेसाठी ते चांगले नसतात. 

चेहर्‍यावर पुरळ उठते.  पिंपल्स वाढतात. त्वचा तेलकट होते. हळूहळू खराब दिसायला लागते. 

अति गोड खाल्याने त्वचा तेलकट होते. साखर खाणे जसे आरोग्यासाठी चांगले नाही तसेच त्वचेसाठीही चांगले नाही. त्यामुळे विकतचे कोल्ड्रींग तसेच केक वगैरे खाणे बंद करा. साखरेचा वापर कमी करा. 

काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांचा त्रास होऊ शकतो. दूध जरी पौष्टिक असले तरी काही लोकांच्या त्वचेला ते सहन होत नाही. अशा लोकांनी त्याला पर्यायी असलेले पदार्थ खावेत. 

तळलेले पदार्थ त्वचेसाठी अजिबात चांगले नाहीत. त्वचेवरील छिद्रांचा आकार वाढतो. तसेच त्वचा तेलकट होते. 

पाव ब्रेड असे बेकरी प्रॉडक्ट्स पदार्थ त्वचेसाठी चांगले नाहीत. ब्रेड खातच असाल तर ब्राऊन ब्रेड खा. 

काहींना भरपूर मीठ खायची सवय असते. अति मीठ खाल्यानेही त्वचा खराब होते. त्यामुळे मीठाचे प्रमाण संतुलित असावे. 

व्यसनांमुळे त्वचा खराब होते. अल्कोहोलयुक्त पदार्थ तसेच तंबाखू असलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी चांगले नाहीत. 

Click Here