वॉकिंग करताना ५ चुका केल्यास फायद्याऐवजी होईल नुकसान 

अनेक लोक व्यायाम म्हणून वॉकिंग करण्याचा पर्याय निवडतात त्यांच्या सोयीनुसार चालायला जातात.

पण वॉकिंग करताना पुढील काही चुका करणं टाळायला हवं, कारण त्यामुळे शरीराला हवा तसा फायदा मिळत नाही. कधी कधी तर नुकसानही होऊ शकतं. 

सगळ्यात पहिली चूक म्हणजे सुरुवातीला कोणतेही वार्मअप एक्सरसाइज न करता अगदी जलद चालायला सुरुवात करणं..

प्रत्येक व्यायाम केल्यानंतर काही मिनिटांचा आराम हवाच. म्हणूनच योगा केल्यानंतर शवासन करायला सांगतात. त्यामुळे चालण्याचा व्यायाम झाल्यानंतरही काही वेळ शांत, रिलॅक्स बसा.

खूप जलद तसेच खूप सावकाशपणे चालणे टाळावे. यामुळे शरीराला पाहिजे तसा फायदा होत नाही.

काही लोक चालत असताना सतत खाली जमिनीकडे पाहतात. अशा पद्धतीने चालणे टाळले टाळायला हवे. चालताना तुमचा चेहरा सरळ आणि नजर समोर हवी. 

अनेक जणांना पाठीला बाक काढून चालण्याची सवय असते, ती देखील अतिशय चुकीची आहे.

चालताना तुम्ही पायात कोणते बूट घालत आहात हे देखील खूप महत्त्वाचे आहे. जड बूट नकोत तसेच खूप पातळ सोल असणारेही बूट नकोत..

Click Here