काही झोपायच्या स्थिती आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. खास म्हणजे महिलांसाठी.
आपण झोपताना कसेही झोपतो. आई बरेचदा ओरडते की वाकडी-तिकडी झोपू नकोस. पण आपण लक्ष देत नाही.
काही जणांना पाठीवर झोपायला आवडते तर काहींना पोटावर. तसेच अनेक जण कुशीवर झोपतात. काही रात्रीत सतत कुस बदलतात.
माणसाला सलग आठ तासाची झोप गरजेची असते. मात्र झोपताना कसे झोपता ते ही पाहणे फार गरजेचे असते. कसेही वेडेवाकडे झोपू नका.
अनेकांना पोटावर झोपायची सवय असते. मात्र पोटावर झोपल्यामुळे छातीवर जोर पडतो. तसेच पाठीच्या कण्यालाही त्रास होतो. श्वासोच्छवासाची प्रक्रिया हळू होते.
डाव्या बाजूच्या कुशीवर झोपल्यामुळे घोरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच पाठीला त्रासही होत नाही.
सरळ झोपणे कधीही चांगले. पाठीवर झोपायचे. पायांच्यामध्ये उशी घेतली तर पायाला आराम मिळतो. तसेच गुडघ्यांनाही आधार मिळतो.
गुडघे जरा वर करुन झोपणेही चांगले आहे. तसे झोपल्याने सर्वच अवयवांना आराम मिळतो. कोणत्याही अवयवावर जोर येत नाही.