तूप खाणे नक्कीच चांगले आहे. मात्र तूप खाताना या काही चुका अजिबात करु नका.
तूप आहारा असायलाच हवेत. फार पौष्टिक असते. आरोग्यासाठी एकदम मस्त असते. मात्र एखादा पदार्थ कितीही आरोग्यदायी असल्या तरी योग्य पद्धतीनेच खाव्यात.
तूप खाताना आपण काही चुका करतो. त्या टाळणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. त्यामुळे पाहा कोणत्या चुका टाळायलाच हव्यात.
तूप जास्त गरम करायचे नाही. तूप गरजेपेक्षा जास्त तापवल्यामुळे त्याची चव आणि पोषण बदलते. त्यामुळे नुसते तूप अति गरम करु नका.
तूप चविष्ट आणि पौष्टिक असले तर अतिरेक कशाचाच चांगला नाही. तूप बेतानेच वापरावे. फार जास्त तूप खाऊ नका.
अॅसिडीक पदार्थ तुपावर परतून खाणे टाळा. त्यामुळे तुपातील पोषण मिळत नाही.
तू कधीही उघडे ठेवायचे नाही. चारही बाजूंनी बंद असणाऱ्या डब्यातच ठेवायचे आणि प्लास्टीकमध्ये ठेवणे टाळा. तसेच ओल्या ठिकाणी ठेवायचे नाही.
बरेचदा तूप आणि तेल एकत्र घेतले जाते. हे दोन्ही पदार्थ एकत्र जर केले तर तुपातील पोषण मिळणार नाही.
तूप घरचे खाणे कधीही उत्तम. विकतच्या तुपाची काही खात्री देता येत नाही. त्यात इतरही पदार्थ असू शकतात.