तुझी माझी जमली जोडी, वयात १८ वर्षाचे अंतर तरीही प्रेमच जिंकलं 

अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचं नक्की जमलं कसं ?

मराठी फिल्म इंडस्ट्री आणि रंगमंचावरील एक आदरणीय नाव म्हणजे अशोक सराफ. सगळ्यांना हसवणार्‍या अशोक सराफांनी त्यांचे करियर भरपूर कष्टाने उभारले. 

पदोपदी त्यांना साथ दिली ती त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी. एका मुलाखतीत अशोक सराफांनी सांगितले होते की संसार सुखी झाला तो निवेदितामुळेच. 

अशोक सराफ यांच्यासोबत चित्रपटांत काम करताना निवेदिता त्यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी मुलाखतीत कायम सांगितले आहे की अशोक सराफांचे व्यक्तिमत्व निवेदितांना फार आवडले. 

अशोक सराफ निवेदितांपेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत. त्यामुळे त्याचे लग्न ठरण्यात फार अडथळे निर्माण झाले. वयात एवढी तफावत असल्याने अशोक सराफांनीही जरा विचार केलाच.

निवेदिता यांनी लग्न केले तर अशोकशीच करणार असे घरी सांगून टाकले. अशोक सराफांनी तरीही नकारच दिला मात्र निवेदितांनी त्यांना मनवणे सोडले नाही. 

धूमधडाका या चित्रपटात निवेदिता व अशोक सराफ यांनी प्रथमच एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांची जोडी गाजायला लागली. 

'शेवटी निवेदिताच्या प्रेमात मी पडलोच आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर निर्णय तोच होता' असे ही अशोक सराफांनी मुलाखतीत सांगितले आहे. 

Click Here