महिलांसाठी आनंदाचा सिक्रेट कोड, विसरा सगळी दुःख

महिलांनी कायम लक्षात ठेवायला हव्यात या काही गोष्टी. 

महिला त्यांचे आयुष्य काही सीमारेषांपर्यंत सीमित ठेवतात. इतरांसाठी जगतात स्वत:साठी जगायचे राहून जाते. मात्र त्यांनी ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले ते करणे त्यांना बंधनकारक नाही.

काही अगदी साध्या गोष्टी आहेत. प्रत्येक महिलेने स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. 

स्वतःचे मन मारुन जगू नका. आवडत्या गोष्टींना दूर करु नका. इतरांना आनंदी ठेवताना तुम्हीही राहू शकता आणि ते राहायलाच हवे. जास्त ताण घेऊ नका. 

घरी जेवण स्वत:च्या आवडीचे जेवणही करायला हवे. सगळ्यांच्या फर्माईश पूर्ण कराच मात्र स्वत:चे मन मारुन नको.

कोणताही लहान-मोठा उद्योग सुरू करायचा असेल तर बिनधास्त करा. कोण काय बोलेल याचा विचार करु नका. आजकाल अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. तुम्हीही नक्कीच राहू शकता. 

आरोग्याची काळजी घ्या. व्यायाम करा, चालायला जा. वेळेत झोपा जास्त कामं करत जागू नका. 

बँकेचे व्यवहार, तंत्रज्ञान, पैशांची गुंतवणूक या गोष्टींबद्दल सतत माहिती घेत राहा. सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल सुजाण राहा.   

व्यक्त व्हा. मत मांडा. मनात गोष्टी साठवून ठेऊ नका. त्याचा जास्त त्रास होईल. मन मोकळेपणाने कुटुंबियांशी संवाद साधा. 

Click Here