अँण्टी एजिंगसाठी विविध ट्रिटमेंट्स महिला करुन घेत असतात. जर काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर कोणत्या ट्रिटमेंट्स करायची वेळच येणार नाही.
चेहरा चांगला स्वच्छ राहावा यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. तसेच ग्रीन टी सारखी पेये पिणेही गरजेचे असते. त्यामुळे त्वचा चांगली राहते.
सूर्यप्रकाशाचा त्वचेला त्रास होतो. कायमस्वरुपी परिणाम होतात. त्यामुळे सनस्क्रिन लावा तसेच इतरही काही उपाय करा.
आहारामध्ये पौष्टिक चांगले पदार्थांचा समावेश करा. त्याचाही त्वचेवर परिणाम होतो. जीवनसत्त्व, प्रथिने, फायबर, आदी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले पदार्थच खा.
झोप अत्यंत महत्त्वाची असते. ७ ते ९ तासांची झोप घ्यायलाच हवी. वेळेवर झोपा व वेळेवरच उठा.
माणूस अति ताणामुळेही म्हातारा दिसायला लागतो. त्यामुळे मानसिक ताणतणाव मॅनेज करायला शिका. त्यासाठी मेडीटेशन करा. डोक्यातील नकोते विचार काढून टाका.
रोज व्यायाम करा. आरोग्य चांगलं राहण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते. व्यायामासाठी रोज थोडावेळ काढायलाच हवा.
भाज्या खा. फळे खा. तसेच फळभाज्याही खा. कडधान्ये खा. चांगला आहार घेणे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.