केसांना लिंबू लावणे अतिशय फायदेशीर ठरते. बघा त्यामुळे केसांवर नेमका कोणता परिणाम होतो..
लिंबू एक नॅचरल क्लिंझर म्हणून ओळखले जाते. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी जसा लिंबाचा उपयोग होतो, तसाच डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठीही लिंबू उपयुक्त ठरते.
डोक्यातला कोंडा कमी झाला की आपोआपच केस गळण्याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस वाढायला मदत होते.
केसांमध्ये कोंडा असल्यास डोक्यातून घाण, कुबट वास येतो. जर तुम्ही लिंबू नियमितपणे केसांना लावले तर डोक्यातली दुर्गंधीही कमी होते..
केसांना लिंबू लावायचं असेल तर ते नेहमी खोबरेल तेलामध्ये मिसळूनच लावावं.
त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका. केस छान चमकदार होतील.