आता आपण अशी एक खास गोष्ट पाहूया जी करायला विदेशातले लोक अजिबात विसरत नाहीत..
विदेशातले बहुतांश लोक घराबाहेर पडण्यापुर्वी एक काम नक्की करतात आणि शिवाय त्यांच्यासोबतही ती वस्तू आठवणीने घेऊन जातात.
ती वस्तू म्हणजे सनस्क्रिन लोशन. सनस्क्रिन लाेशन लावण्याबाबत विदेशी लोक अतिशय काटेकोर आहेत.
कारण सुर्यप्रकाशापासून येणाऱ्या युव्ही किरणांपासून त्वचेचं संरक्षण करायचं असेल तर सनस्क्रिन लोशन लावणं खूप गरजेचं आहे.
घराबाहेर पडतानाच नाही तर घरात राहणाऱ्यांनीही नेहमीच सनस्क्रिन लोशन लावायला हवं असं ब्यूटी एक्सपर्ट सांगतात..
तसेच फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्येही सनस्क्रिन लोशन लावणं गरजेचं आहे.
सनस्क्रिन लोशन घेताना ते चांगल्या दर्जाचं हवं.. तरच ते तुमच्या त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकेल.