आलियाचे असेच काही पांढऱ्याशुभ्र कपड्यातील सुंदर आणि एलिगंट लुक्स तिच्यावर खूपच खुलून दिसतात.
आलिया भट कायमच तिच्या हटके आणि क्लासी लुक्समुळे चर्चेत असते.
आलियाचे आत्तापर्यंतचे गाजलेले ऑल व्हाईट लुक्स कोणकोणते आहेत ते पाहूयात...
आलिया सुंदर आणि पांढऱ्याशुभ्र असणाऱ्या या स्ट्रेपलेस गाऊनमधे खूप सुंदर दिसत आहे. आपणही असा स्ट्रेपलेस गाऊन लूक ट्राय करु शकता.
पांढऱ्या रंगाच्या बटर सिल्क साडीमध्ये आलियाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. गळ्यात तिने नाजूक मोत्यांचा चोकर घातला आहे.
२०२३ साली Met Gala इव्हेंटमध्ये उपस्थिती लावताना आलियाने खास १ लाख मोत्यांनी सजविलेला सुंदर मोत्यांचा गाऊन परिधान केला होता. तिचा हा लूक प्रचंड गाजला.
व्हाईट पॅन्टसोबत तिने व्हाईट ब्लेजर खूपच स्टायलिश पद्धतीने कॅरी केलेला दिसत आहे.
आलियाचा व्हाईट पोलका डॉट फ्रॉक देखील खूपच सुंदर आहे, व्हाईट हिल्स सोबत पेअरिंग करुन आपण क्लासी लुक्स करु शकता.
आलियासारखा व्हाईट शिफॉन पंजाबी सूट आपण एखाद्या खास प्रसंगी देखील घालू शकता.
चिकनकारी साडी सोबतच आलियाने स्लिव्हलेस ब्लाऊज खूपच हटके पद्धतीने कॅरी केला आहे.
आलिया तिच्या सगळ्याच ऑल व्हाईट लुक्समध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.