लहान मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्याचे भन्नाट उपाय

मोबाईलचा जास्त वापर मुलांच्या आरोग्यासाठी, विकासासाठी अत्यंत घातक

हल्ली मुलं मोबाईलमध्ये जास्त वेळ रमलेली दिसतात. रिल्स पाहण्यात आणि गेम खेळण्यातच त्यांचा सर्व वेळ वाया जातो.

बऱ्याचदा पालकच मुलांना गप्प बसण्यासाठी मोबाईल देतात. पण  मुलांच्या आरोग्याच्या आणि विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. 

काही भन्नाट उपाय करून तुम्ही लहान मुलांना मोबाईलपासून लांब ठेवू शकतात. ज्याचा मुलांनाच भरपूर फायदा होईल.

मुलांसोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत गेम खेळा. त्यांचा अभ्यास घ्या, गोष्टी सांगा, छंद जोपासा. नवनवीन गोष्टी शिकवा.

मुलांना बागेत फिरायला न्या, त्यांच्यासोबत मैदानी खेळ खेळा. गप्पा मारा. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करा. सायकल चालवायला शिकवा.

मुलांना घरातील छोटी छोटी कामं करायला शिकवा. किती वेळ मोबाईलचा वापर करायचा याची वेळ ठरवून घ्या. 

Click Here