गरम चाय की प्याली हो!

भारतात घरोघरी चहा केला जातो. वेळेला चहा हवाच, असे आपल्याकडे म्हणतात. सकाळी व संध्याकाळी दोनदा तरी चहा प्यायला जातोच. 

चहामध्ये चहा पूड, साखर, पाणी व दूध हे पदार्थ मुख्य असतात. मग त्यात आपण आलं घालतो. इतरही काही पदार्थ आहेत जे चहाची चव वाढवतात आणि पौष्टिकही असतात.

चहामध्ये गवती चहा टाकला जातो. गवती चहाबरोबर तुळशीची पाने चहासाठी पाणी उकळताना त्यात घाला. चव छान लागते.

चहामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दालचिनी घालायची. दालचिनीचा चहा छान लागतो.

वेलचीचा चहा अगदीच मस्त लागतो. साखरेच्या किंवा चहापूडच्या डब्यामध्ये वेलचीची सालं घालून ठेवायची. 

गुळाचा चहा चवीला छान लागतो. पौष्टिकही असतो.     

काळी मिरीचा चहा चांगला लागतो. घसा तसेच सर्दी बरी होते. 

कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून तो चहा पिणे पोटासाठी चांगले असते. असा चहा आरोग्यासाठी धोक्याचा नाही. 

Click Here