जेमिनाय रेट्रो एआय फोटोंचा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडची रेश्मालाही भुरळ पडली आहे.
छोट्या पडद्यावरील 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदेने जानकीची भूमिका साकारली आहे.
आधी घिबली फोटोंचा ट्रेंड होता आणि त्यानंतर आता जेमिनाय रेट्रो एआय फोटोंचा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडची रेश्मालाही भुरळ पडली आहे.
रेश्माने वेगवेगळ्या साडीतले जेमिनाय रेट्रो एआय फोटो शेअर केले आहेत. यात ती सुंदर दिसते आहे.
अभिनयाची सुरुवात रेश्माने २००९ साली 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून केली होती.
रेश्मा शिंदेनेही याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
रेश्मा शिंदेने 'लगोरी', 'चाहूल', 'नांदा सौख्य भरे' या मालिकांमध्ये काम केलं आहे.
रेश्मा शिंदेने मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'लालबागची राणी' आणि 'फुगे' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या आहेत.