भूमी पेडणेकरच्या मोठ्या ओठांची नेटकऱ्यांनी उडवली थट्टा
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरची नवी सीरिज द रॉयल्समुळे चर्चेत आली आहे.
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली द रॉयल्सला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे.
दरम्यान यातील भूमी पेडणेकरच्या परफॉर्मन्ससह लूक्सवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. लोकांना यातील तिचं काम भावत नाहीये.
परफॉर्मन्ससोबत अभिनेत्रीच्या बॉडी आणि ओठांवर कमेंट केली जात आहे. असं म्हटलं जातंय की, तिने लिप सर्जरी किंवा फिलर्स केले आहे. तिचे मोठे ओठ खूप विचित्र वाटत आहे.
भूमीवर पहिल्यांदा कॉस्मेटिक सर्जरी केल्याचा आरोप झालेला नाही. यापूर्वीही तिने याचा सामना केला आहे.
भूमी पेडणेकरचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती ट्रोलर्सना उत्तर देताना दिसते आहे. ती म्हणतेय की, लोक तिला म्हणत आहेत की, तिचे ओठ खूप मोठे आहेत.
ती पुढे म्हणाली, लोक यासाठी लाखो रुपये खर्च करून सर्जरी करत आहेत. तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला राहिले पाहिजे. लोक काहीही विचित्र गोष्टी बोलत राहतात.