अभिनेत्याचा शेतातला व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
अभिनेता अभिजीत केळकर बिग बॉस मराठी शोच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आला.
अभिजीत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.
अभिनेत्याने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं.
सध्या अभिजीतचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
तो त्याच्या गावी अलिबागमध्ये असून तिथे शेती करत आहे. त्याच्या शेतातल्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
गावच्या शेतीत तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भात लावणीला गेला आहे. अलिबागमधील किहीम या गावी तो एक मोठं घर बांधत आहे.