हे फायदे वाचल्यानंतर पुन्हा खायला सुरुवात कराल...
नैसर्गिक पोषक तत्त्वांचा स्त्रोतभाकरीत कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला ऊर्जेचा उत्तम स्त्रोत मिळतो.
पचनासाठी फायदेशीरज्वारी, बाजरी, नाचणीच्या भाकरीत भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
वजन नियंत्रणात मदतभाकरी दीर्घकाळ पोट भरलेले ठेवते. त्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
ग्लुटेन-फ्री पर्यायबाजरी, ज्वारी किंवा नाचणीच्या भाकऱ्या ग्लुटेन-फ्री असतात. ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय.
हृदयासाठी आरोग्यदायीभाकरीतील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
मधुमेहींसाठी लाभदायकज्वारी आणि बाजरीची भाकरी लो-ग्लायसेमिक इंडेक्स असलेली असते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
हाडांसाठी उपयुक्तनाचणीच्या भाकरीत कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. हाडे आणि दात मजबूत राहतात.
उष्णतेत शरीर थंड ठेवतेज्वारीची भाकरी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. उन्हाळ्यात खाण्यासाठी उत्तम.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेभाकरीतील खनिजे आणि जीवनसत्त्वे शरीराला बळकटी देतात. आजारपणापासून बचाव होतो.