कस्तुरीला बाजारात किती किंमत मिळते? हेच आज जाणून घेऊ.
कस्तुरीमधून खूप सुगंध येतो. कस्तुरीचा अनेक धार्मिक कार्यात, आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासही यानं फायदा मिळतो.
कस्तुरी हरणाच्या नाभिजवळ असलेली एक पिशवी असते. पण हरणाला हे माहीत नसतं की, हा सुगंध कुठून येत आहे. याच सुगंधाचा शोध घेत ते जंगलात फिरतात.
काही नर हरणांमध्ये मस्क ग्लॅंड नावाचा एक अवयव असतो. जो एक लिक्विड प्रोड्यूस करतो. हे लिक्विड एका जागी जमा होतं.
कस्तुरी हिमालयन मस्क डिअरमध्ये आढळते. ज्याचं वैज्ञानिक नाव 'मास्कस क्रायसोगो' असं आहे. ही केवळ नर हरणामध्ये असते. हे हरीण आशियात आढळतात.
या हरणांना इतर हरणांसारखी शिंगही नसतात. एका हरणामधून साधारण २५ ते ५० ग्रॅम कस्तुरी मिळते. ज्यासाठी हरणांची मोठी शिकार केली जाते.
एका रिपोर्टनुसार, याचं पावडर ३० हजार रूपये भावानं बाजारात विकलं जातं. तर याचं तेल १० हजार रूपयांनी विकलं जातं.