भरपूर लोक गरम किंवा कोमट पाणी पितात. हे पाणी पिण्याचे नियम माहीत नसतात.
कोमट पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. पण काही अशा स्थिती असतात ज्यात कोमट पाणी पिणं नुकसानकारक ठरतं.
कोमट पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या वाढते. आधीच डिहायड्रेशन झालं असेल आणि कोमट पाणी प्याल तर स्थिती गंभीर होऊ शकते.
जर तोंडात फोड आले असतील किंवा घशातून एखाद्या कारणाने रक्त येत असेल तर गरम किंवा कोमट पाणी टाळलेलं कधीही चांगलं.
नेहमीच गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या आतील नाजूक भाग डॅमेज होऊ शकतो. यामुळे पोटात गॅस्ट्रिक अल्सर होण्याचाही धोका असतो.
अॅसिडिटीची समस्या नेहमीच होत असेल तर चुकूनही गरम पाणी पिऊ नये. याने त्यांना अॅसिड रिफ्लक्सची समस्या होऊ शकते.
ताप आल्यावर शरीराचं वाढलेलं तापमान आणि घाम जात गेल्यानं डिहायड्रेशन होतं. अशात ताप असल्यावर गरम पाणी पिऊ नये.