तुमच्या केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर आहे. हेही माहीत असायला हवं.
केसांना तेल लावण्याआधी हलकं गरम करावं. कोमट तेलानं फॉलिकल्स उत्तेजित करण्यास मदत होते. साधं तेल लावण्यापेक्षा कोमट तेलाचा फायदा अधिक मिळेल.
अनेकजण केसांवर तेल ओततात, पण ही पद्धत चुकीची आहे. कोमट तेल बोटांच्या मदतीनं केसांना आणि केसांच्या मूळांना लावा. डोक्याच्या त्वचेलाही तेल लावा.
तेल लावताना १० ते १५ मिनिटं हलक्या हातानं डोक्याच्या त्वचेची मसाज करा. यानं रक्तप्रवाह चांगला होतो आणि केसांना पोषण मिळतं.
चांगल्या रिझल्टसाठी केसांना रात्रभर तेल लावून ठेवा. जर तुम्ही रात्रभर केसांना तेल लावून ठेवत नसाल तर निदान दोन ते तीन तास केसांना तेल लावून ठेवावं.
तेल लावल्यावर केसांना शक्य असेल तर वाफ द्यावी. केसांना वाफ देण्यासाठी टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि तो १० मिनिटांसाठी केसांना बांधून ठेवा. टॉवेल जास्त गरम असू देऊ नका.
वाफ दिल्यानंतर केस धुवावे. शाम्पूची निवड तुमच्या केसांनुसार करावी. जर केस ऑयली असतील तर ऑयली केसांसाठी फायदेशीर शाम्पू खरेदी करा. जर केस ड्राय असतील तर तसा शाम्पू खरेदी करा.