अनेकांना किडनी स्टोन त्रास असतो.
किडनी स्टोनचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे पाठीच्या किंवा खालच्या भागात असह्य वेदना, जी वेळोवेळी वाढत आणि कमी होत राहते.
जर दगड मूत्रमार्गात पोहोचला तर लघवी करताना जळजळ आणि वेदना जाणवतात.
कधीकधी मूत्र लाल, गुलाबी किंवा तपकिरी दिसू शकते, जे रक्ताची उपस्थिती दर्शवते.
मूत्रपिंडातील दगडांमुळे लघवीची वारंवारता वाढते. लघवी करण्याची तीव्र इच्छा वारंवार होते.
स्टोनमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, यामुळे मळमळ आणि उलट्या होतात.
जर मूत्रपिंडात संसर्ग झाला असेल तर ताप, थंडी वाजून येणे किंवा थरथरणे अशी लक्षणे देखील दिसू शकतात.
एक स्टोन मूत्रमार्गाला अडथळा आणतो, यामुळे लघवीचा प्रवाह अधूनमधून होतो किंवा पूर्णपणे थांबू शकतो.