नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण नियमित वेळेवर घ्या
रात्रीचे जेवण पचायला हलके आणि झोपण्याच्या किमान तीन तास आधी घ्यावे

 सकाळची सुरुवात उत्साही करण्यासाठी नाश्ता पौष्टिक असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण चूकवण्याची गरज अजिबात नाही

नाश्ता (Breakfast)
सकाळी 8 ते 9 या वेळेत नाश्ता करणे उत्तम आहे, कारण या वेळी शरीराला ऊर्जा आणि पोषक तत्वे मिळतात, असे तज्ञांचे मत आहे.

दुपारचे जेवण (Lunch) 
दुपारी 11:30 ते 1:30 या वेळेत जेवण करणे योग्य मानले जाते.

रात्रीचे जेवण (Dinner) 
 हे झोपण्याच्या किमान तीन तास आधी, म्हणजेच साधारणपणे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत घ्यावे, असे तज्ञांचा सल्ला आहे.( रात्रीचे जेवण हलके आणि पचायला सोपे असावे) 

चहा (Tea) 
 चहा पिण्यासाठी जेवणानंतर किमान दोन तासांचे अंतर ठेवावे, सकाळी किंवा संध्याकाळी चहा पिणे ठीक असले तरी, तो जेवणासोबत घेऊ नये.

दूध (Milk)
दूध हे झोपण्याच्या 1/2 तास आधी पिणे आदर्श मानले जाते. यामुळे शांत झोप लागते. सकाळच्या रिकाम्या पोटी दूध टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण पचनक्रियेत समस्या येऊ शकतात. 

एकूणच खबरदारी
जेवण आणि पेयांमध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे. चहामध्ये दूध घेतल्याने शरीरातील लोहाचे शोषण कमी होते आणि ॲनिमिया होऊ शकतो, असेही तज्ञांचे मत आहे. 

दिवसभरात अनेक कप चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे. हे देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. 

Click Here