भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा ४५ क्रमांकाची जर्सी का घालतो? जाणून घ्या
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आज त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
धोनीनंतर भारतासाठी सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकलेल्या कर्णधारामध्ये रोहित शर्माचे नाव घेतले जाते.
रोहित शर्माने भारतासाठी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का रोहित शर्मा ४५ नंबरची जर्सी का घालतो?
रोहितची आईचा अंकशास्त्रावर विश्वास आहे. अंकशास्त्रावरून ९ नंबर हा खूप लकी मानला जातो.
अंडर-१९ विश्वचषकासाठी रोहितची निवड झाली, तेव्हा रोहितच्या आईने त्याच्यासाठी ४५ क्रमांकाची जर्सी निवडली.
रोहितच्या आईने त्याच्यासाठी ४५ क्रमांकाची जर्सी निवडली, त्यामागचे कारण म्हणजे ४ आणि ५ अंकाची बेरीज ९ आहे.