अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतात तुळशीची पाने फायदे वाचून व्हाल अवाक्..!
'असा' करा उपयोग...
ताप ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. लहान मुलांना ताप आल्यानंतर तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी करण्यास मदत होते
दातांचं आरोग्य दातदुखी, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने तोडांत ठेवल्यास चांगला फायदा होतो.
तोडांची दुर्गंधी तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून दुर्गंधी येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचं सेवन करू शकता.
त्वचेची काळजी त्वचेवरील इन्फेक्शने, त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो. तसेच तुळशीची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा टवटवीत होते.
मधुमेहावर नियंत्रण तुळशीमध्ये असलेलं इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात.
मेटाबॉलिज्म तुळशीची पानं आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात.यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टीम दुरुस्त होण्यास मदत होते.
बॉडी डिटॉक्सीफिकेशन तुळशीच्या पानांमध्ये बॉडी डिटॉक्स करण्याची क्षमता असते. याचे गुणकारी तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.
खोकला-सर्दी हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकल्याची समस्या जाणवणं कॉमन आहे.
'असा' करा उपयोग तुम्ही काढा किंवा चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करू शकता.