तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असेल, तर Ai Appsच्या मदतीने तुम्ही हजारो रुपये कमवू शकता.
आजच्या डिजिटल युगात Ai हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर कमाईचे एक उत्तम साधन बनले आहे. तुम्ही स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वापरत असाल, तर या ५ Ai App दरमहा हजारो रुपये कमवू शकता.
ChatGPT- तुम्हाला लिखनाची किंवा कंटेंट क्रिएशनची आवड असेल, तर ChatGPT द्वारे तुम्ही ब्लॉग, स्क्रिप्ट, सोशल मीडिया पोस्ट, जाहिराती किंवा मजकूर तयार करू शकता.
Canva- तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगमध्ये रस असेल, तर कॅनव्हामधील Ai फिचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही सोशल मीडिया पोस्ट, बॅनर, रील्स कव्हर, यूट्यूब थंबनेल डिझाइन करू शकता.
Pictory AI- व्हिडिओ एडिटिंगच्या क्षेत्रात Pictory Ai हे एक क्रांतिकारी अॅप आहे. तुम्ही प्रॉम्प्टद्वारे व्हिडिओ बनवू शकता. अनेक यूट्यूब चॅनेल या अॅपच्या मदतीने व्हिडिओ तयार करतात.
Lumen5- हे आणखी एक उत्तम एआय व्हिडिओ टूल आहे. टेक्स्टद्वारे व्हिडिओ बनवू शकता. याचा इंटरफेस खूप सोपा असून, याद्वारे तुम्ही सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करू शकता.
Grammarly- तुम्ही कंटेंट रायटिंग, ईमेल किंवा ब्लॉगिंग करत असाल, तर Grammarly तुमचा सर्वोत्तम साथीदार बनू शकतो. हा तुमचा लिखित मजकूर दुरुस्त करतो.