जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष- आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल.
वृषभ- शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका.
मिथुन- आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल.
कर्क- आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल.
सिंह- आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील.
कन्या- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल.
तूळ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घराशी संबंधित प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल.
वृश्चिक- आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे.
धनु- आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल.
मकर- आज आरोग्याच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल.
कुंभ- आजचा दिवस मंगल कार्य व नवीन कार्य ह्यांच्या आयोजनासाठी अनुकूल आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील.
मीन- आज आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल.