'या' देशात पक्ष्यांचाही पासपोर्ट-व्हिसा

एक असा देश आहे जिथे पक्ष्यांचाही पासपोर्ट बनतो आणि व्हिसाही बनतो.

सामान्यपणे मनुष्याचे परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट तयार केले जातात. हे त्यांचं नागरिकतेचं ओळखपत्र असतं. पण एका देशात पक्ष्याचंही पासपोर्ट बनतं.

पक्ष्याचं पासपोर्ट बनत असलेला हा देश आहे कतार. कतारमध्ये गरूडाचं पासपोर्ट बनतं. कारण इथे या पक्ष्याला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा आहे.

गरूडांना शिकार अभियान, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मेडिकल ट्रिटमेंटसाठी नेलं जातं. त्यामुळे अधिकृत ओळखपत्रासाठी त्यांचा पासपोर्ट काढला जातो. 

पासपोर्टवर त्यांची प्रजाती, वजन, वय आणि फोटोसोबत मालकाचं नाव व मायक्रोचिप नंबर लिहिलेला असतो.

गरूडाच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी ३ वर्षांसाठी असते. अधिकृत पासपोर्ट असल्यानं त्यांची तस्करी सुद्धा रोखली जाते. 

कतार, यूएई आणि सौदी यांसारख्या देशांमध्ये गरूड विमानाच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करतात.

Click Here