लिव्हर शरीरातील महत्वाचा अवयव आहे. जो अनेक महत्वाची कामं करतो.
अमेरिकन हेल्थ एजन्सी एनआयएचनुसार, लिव्हर मेटाबॉलिज्म, इम्युनिटी, पचन, विषारी तत्व बाहेर काढणं ही कामं करतं.
काही आजार आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लिव्हरचं नुकसान होतं. त्यामुळे लिव्हरची खूप काळजी घ्यावी लागते.
आज आपण तीन अशा फूड्सबाबत पाहणार आहोत. जे लिव्हरला हेल्दी ठेवण्यास खूप मदत करतात.
ब्लूबेरी, रास्पबेरी आणि क्रॅनबेरीसारख्या सर्व प्रकारच्या बेरीजमध्ये पॉलीफेनॉल्स नावाचं अॅंटी-ऑक्सीडेंट असतं, लिव्हरचं नुकसानापासून बचाव करतं.
२०२२ च्या एका रिसर्चनुसार, कॉफी लिव्हरचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. रोज ३ ते ४ कप ब्लॅक कॉफी साखरेशिवाय प्यावी.
रिसर्चमध्ये असंही आढळून आलं आहे की, फायबर असलेली फळं आणि आंबट फळं लिव्हर हेल्दी राहण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. खासकरून आवळा आणि लिंबू.